गुरुवार, ३० मे, २०१३

केतकी पिवळी पडली - लेखक स. तं. कुडचेडकर भाग - १

"केतकी, अग ऐ केतकी,"
"आत्ता काय कराव या पोरीच, सकाळचे आठ वाजले तरी अजून हिचा उठायचा पत्ता नाही!"
"केतके कार्टे उठतेस कि नाहि!" अशी लांब लचक आरोळीच तिच्या आईने दिली.
केतकी रागातच उठली. "आई आहे कि सासू कुणास ठाऊक" अस म्हणून केतकी आंघोळ करायला गेली.
केतकी म्हणजे आपल्या शंकर राव आणि सुमन वाहिनीची धाकटी मुलगी. त्यांचा मोठा मुलगा विजय कामानिमित्त बंगलोरला होता. तर केतकी आपल एम. बीए च शिक्षण पूर्ण करून घरीच आराम करीत होती. तीला काही काम करायचं नव्हत अस नव्हे पण त्याला अजून थोडा वेळ आहे असे ती म्हणे. थोडे दिवस आराम करून आपण बाबांच्या शिपिंग कंपनीत काम करणार आहोत अस तीन तिच्या परीक्षा चालू असतानाच जाहीर केल होत.
खर तर केतकीची आपण आराम करीत आहोत हि थापच होती. ती आराम करीत नसून आपल्या दुखी मनाला समजावीत असत. तिच्या एम. बि.ए. च्या परीक्षा चालू होण्यापूर्वी तिच्या प्रियकराने तिला एकांतात भेटावयास बोलाविले होते. आणि यापुढे आपल्या दोघांचे हे नाते निभावण्यास आपण असमर्थ आहोत असे सांगितले. हे ऐकून केतकीला खूप राग आला. तीच स्त्री मन खळवळून उठलं. तिला खात्री होती कि तिच्या प्रेमाच्या मध्ये कोणीतरी तिसरच आलय. तिने तस आपल्या प्रियकराला विचारलही. त्याने मान खाली घालून आपण आपल्या चाळीतल्याच एका मुलाच्या प्रेमात पडलो आहोत असे सांगिले. ते एकूण 'केतकी पिवळीच पडली'. आणि आपण पुन्हा कध्धी कध्धी प्रेम करायचं नाही अस ठरवूनच परीक्षेला बसली.
पण आपण जे  ठरवू ते तसच्या तस थोडीच होत. ती त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न करूनही त्याला विसरू शकत नव्हती. तेव्हा ती स्वतःला म्हणे, "केतकी विसर त्याला, विसर. कायमच विसर!"
 पण हाय !! ती त्या विसरूच शकत नव्हती.
याचा तिला खूपच मनस्ताप होत होता. आपण अशा माणसाला विसरू शकत नाही ज्याला त्याच माझ्यावरच प्रेम म्हणजे त्याच्या आयुष्यातील मोठी चूक वाटते.
"नाही नाही केतकी, तू त्याला विसरायलाच हव. त्याला विसरायचा प्रयास तू करायलाच हवा." ती सतत आपल्या मनाला समजावत राही. तुझ्या कडे काही कमी प्रतिभा (Talent) नाही. त्याच्या जोरावर तू जगातील कुठचेही सुख मिळवू शकशील. त्यासाठी तुला त्याला विसरायचा प्रयास करायला हवा. शेवटी प्रयास हा प्रतिभेचा प्राण वायू आहे हेच खर. पूर्ण प्रयत्नानीशी त्याला विसरू म्हणजे आपण एक नवीन आयुष्य सुरु करु.